तबलिगीसोबत शीख समाजाची तुलना केल्याप्रकरणी काँग्रेस नेते दिग्विजय सिंग यांच्या विरुध्द फिर्याद

0
456

प्रतिनिधी,दि.७ (पीसीबी) : नांदेड मधील गुरुद्वारा लंगर साहिब येथुन पंजाब मध्ये परतलेल्या शीख भाविकांची तुलना मरकज मध्ये लॉकडाऊन नंतर अडकलेल्या तबलिगींशी करणार का ? असा सवाल त्यांनी ट्वीटद्वारे उपस्थित केला होता. दिग्विजय सिंग यांच्या या वादग्रस्त ट्वीट नंतर देशभरातील शीख समाजात संतापाची लाट उसळली. शीख समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप करीत शिरोमणी अकाली दलाने दिग्विजय सिंग विरुद्ध पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. वादग्रस्त विधानांमुळे नेहमी चर्चेत असलेले कॉंग्रेसचे नेते दिग्विजय सिंग शीख समाजाबद्दल केलेल्या विधानामुळे अडचणीत सापडले आहेत.

नांदेड येथील श्री हजूर साहिब गुरुद्वारा येथे अडकलेले भाविक पंजाबला परतल्यावर कोरोना पॉझिटिव असल्याची धक्कादायक बाब चाचणीतून समोर आली. एका आठवड्यातच पंजाबमध्ये एक हजारपेक्षा जास्त कोरोनाचे रुग्ण वाढले. कॉंग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी, “नांदेड मधील गुरुद्वारा लंगर साहिब येथुन पंजाब मध्ये परतलेल्या शीख भाविकांची तुलना मरकज मध्ये लॉकडाऊन नंतर अडकलेल्या तबलिगींशी करणार का ? ” असा सवाल ट्वीट द्वारे उपस्थित केला. दिग्विजय सिंह यांच्या या वादग्रस्त ट्वीटमुळे कॉंग्रेसवर चौफेर टीका होऊ लागली आहे. शिरोमणि गुरुद्वारा प्रबंधक कमीटी या शीख समाजाच्या सर्वोच्च संस्थेने दिग्विजय सिंह यांच्या या वादग्रस्त ट्वीटवर तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली. ” कॉंग्रेस नेते दिगविजय सिंग यांनी शीख व मुस्लीम समाजाच्या भावना भडकवल्या असून शीख समाजाची बदनामी केली आहे. तसेच शीख समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप ठेवत शिरोमणी अकाली दलाचे नेते व माजी मंत्री बिक्रम मजीठिया यांनी दिग्विजय सिंग यांच्या विरुद्ध पोलिसात फिर्याद दाखल केली. इंडियन पिनल कोडच्या कलम २९५ अ, २९८, १५३ अ व १५३ ब अन्वये दिग्विजय सिंग यांच्या विरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी मजीठीया यांनी केली आहे.