डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतनिमित्त ‘एक वही एक पेन’ उपक्रम.

0
242

पिंपरी, दि. १४ (पीसीबी) -डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाच्या जोरावर राज्यघटना लिहिली. याद्वारे समानता,न्याय आणि स्वातंत्र्य सर्व भारतीयांना बहाल केले. राज्यघटनेच्या माध्यमातून समाजातील वंचित घटकांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडली. याच शिक्षणामुळे घटना निर्माण झाली आणि म्हणूनच
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त एक वही एक पेन हा उपक्रम राबवण्यात आला.

या उपक्रमाचे आयोजन राष्ट्रवादीचे दळवीनगर सामाजिक न्यायचे अध्यक्ष स्वप्नील म्हस्के यांनी केले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष राष्ट्रवादी पदवीधर संघाचे शहराध्यक्ष माधव पाटील हे होते. या उपक्रमाअंतर्गत
दळवीनगर रेल्वेलाईन जवळील वस्तीतील ५० मुलांना वही आणि पेन यांचे वाटप करण्यात आले.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माधव धनवे पाटील म्हणाले की ही लहान मुलं या १३१ व्या जयंतीदिनी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडून शिकण्याची आणि अभ्यासात मेहनत घेण्याची प्रेरणा घेतील. या प्रेरणेतूनच ही मुलं उद्याचे शास्त्रज्ञ,मंत्री, कंत्राटदार,प्रशासकीय अधिकारी आणि अन्यायाविरुद्ध लढणारे वकील बनतील. यावेळी गौरी म्हस्के,बलभीम म्हस्के, धनु जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बालाजी सोनकांबळे यांनी सर्वांचे आभार मानले.