‘डेथ पास’ही आता ऑनलाईन…

0
353

प्रतिनिधी, दि.१९(पीसीबी) एखाद्या नागरिकाचा मृत्यू झाल्यास, अंत्यसंस्कार करण्यासाठी अंत्यविधी पास महत्त्वाचा असतो. महापालिका रुग्णालय, क्षेत्रीय कार्यालय, ससून हॉस्पिटल आणि विश्रामबाग येथे पासेस देण्याची व्यवस्था आहे. परंतु ऑफिस संध्याकाळी बंद झाल्यानंतर, ऐनवेळी कुटुंबात अघटित घटना घडली तर मयतांच्या नातेवाईकांना पास कोठे मिळतात हे समजत नाही.

त्याएखाद्या नागरिकाचा कुठल्याही रुग्णालयात मृत्यू झाल्यास त्याच रुग्णालयामधून पी.एम.सी केअर deathpass.punecorporation.org या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करून हा पास घेता येणार आहे. यासाठी पहिल्या टप्प्यात वैकुंठ, कैलास आणि येरवडा स्मशानभूमीत संगणक बसविण्यात आले आहेत. आजपासून ही सुरूवात झाली.