डिलिव्हरीसाठी कंटेनरमध्ये भरलेल्या दोन लाखांच्या बिस्किटांचा अपहार

0
310

तळेगाव दाभाडे, दि. ८ (पीसीबी) – डिलिव्हरीसाठी कंटेनरमध्ये भरलेल्या दोन लाखांच्या बिस्किटांचा कंटेनर चालकाने अपहार केला. हा प्रकार पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर उर्से टोलनाक्याजवळ तीन ते सहा जुलै या कालावधीत घडला.

रामू दीनदयाल असे गुन्हा दाखल झालेल्या कंटेनर चालकाचे नाव आहे. याबाबत आशिष अश्विनी कुमार वय 29, रा. खारघर, मुंबई यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कंटेनर चालक रामू दीनदयाल याच्या कंटेनरमध्ये एम एच 43 वाय 7937 फिर्यादी यांनी 2 लाख रुपये किमतीचा बिस्किटांचा माल भरला. आरोपी कंटेनर चालकाने फिर्यादी आणि त्यांच्या कंपनी प्रशासनाच्या संमतीशिवाय कंटेनरमध्ये भरलेले 120 ते 130 बॉक्स कंटेनर मधून काढून त्याचा अपहार केला. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.