ठाण्यात शिवसेनेचा बिनविरोध महापौर आणि उपमहापौर

0
674

मुंबई,दि.२१(पीसीबी) – आज ठाण्याच्या महापौरपदासाठी निवडणूक झाली.ठाणे महापालिका महापौरपदी शिवसेनेचे नेते नरेश म्हस्के तर उपमहापौरपदी पल्लवी कदम यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आमदार, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि विधानसभेचे शिवसेनेचे गट नेते एकनाथ शिंदे उपस्थित होते.

ठाणे महापालिकेवर पुन्हा एकदा शिवेसेनेची सत्ता आली आहे. या निवड प्रक्रियेनंतर ठाण्यात भव्य मिरवणूक काढण्यात आली. नरेश म्हस्के आणि पल्लवी कदम यांचा सत्कार करण्यात आला. ठाण्यात शिवसेनेने मिळवलेल्या या यशात एकनाथ शिंदेंचं मोठं योगदान असल्याचं बोललं जात आहे.