जुन्या भांडणाच्या कारणावरून तरुणाला मारहाण

0
292

पिंपळे गुरव, दि. २० (पीसीबी) – पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून तीन जणांनी एका तरुणास मारहाण केली. ही घटना पिंपळे गुरव येथे शनिवारी (दि. 17) पहाटे घडली.

रोहन फ्रान्सिस अमोलिक (वय 21, रा. वक्रतुंड बिल्डींग, पिंपळे गुरव) असे मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्यांनी याबाबत सोमवारी (दि. 19) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. लाली आणि त्याचे दोन साथीदार (नाव, पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी लाली आणि फिर्यादी रोहन यांच्यात काही दिवसांपूर्वी भांडण झाले होते. या भांडणाचा राग मनात धरून आरोपी लालीने शनिवारी पहाटेच्या सुमारास रोहन यांना अज्ञात वस्तूने मारहाण केली. तसेच इतर दोन आरोपींनी लाथा-बुक्‍क्‍यांनी मारहाण करीत जखमी केले. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.