जामिनावर तुरूंगातून सुटल्यानंतर मिरवणूक काढल्याप्रकरणी सराईत रंज्यासह ८ जणांवर गुन्हा

0
1263

चिंचवड, दि. ४ (पीसीबी) – खूनाच्या प्रकरणात जामिनावर सुटल्यानंतर चिंचवड परिसरात बेकायदेशीर जमाव जमवून मिरवणूक काढली. तसेच दहशत निर्माण केल्याप्रकरणी सराईत गुन्हेगार ‘रंज्या’सह ९ जणांवर चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी रंज्या ऊर्फ रणजित चव्हाण (वय२५ रा. वेताळनगर, चिंचवड) यांच्या सह शुभम थोरात, जिच्या गायकवाड, विकी टिपाले, योगेश गायकवाड, साहिल कुंभार, परश्या कांबळे, गोप्या अहिवळे, गणेश खांगटे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रंज्याची २० जानेवारी रोजी आकाश लांडगे खूनप्रकरणातून जामिनावर सुटका झाली आहे. त्यानंतर त्याच्या साथीदारांनी रंज्याची हातात दांडके, तलवारी घेऊन मिरवणूक काढली. यावेळी येथून निघून जा, नाहीतर तुमची सुट्टी नाही, अशी तंबी देऊन घोषणाबाजी केली.

दरम्यान, या मिरवणुकीचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. या व्हिडीओची गंभीर दखल पोलीस आयुक्त आर .के. पद्मनाभन यांनी घेऊन रंज्यावर व संबंधितांवर तातडीने गुन्हा दाखल करण्याचे आदेश चिंचवड पोलिसांना दिले. त्यानंतर रंज्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करत वाकड पोलिसांच्या ताब्यात त्याला देण्यात आले. वाकडमधील दोन गुन्ह्यात तो फरार होता.