जागा घेण्यासाठी माहेरहून पैसे आणण्याची मागणी करत पत्नीचा छळ केल्याप्रकरणी पोलीस शिपायावर गुन्हा

0
447

भोसरी, दि.१(पीसीबी) – जागा घेण्यासाठी माहेरहून पैसे आणण्याची मागणी करत पत्नीचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पोलीस शिपाई असलेल्या पतीसह सासू, सासरे, दीर आणि दोन नणंदांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हा प्रकार कुर्ला पोलीस लाईन, कुर्ला आणि घाटकोपर मुंबई येथील चिरागनगर पोलीस लाईन येथे 29 डिसेंबर 2008 ते 30 नोव्हेंबर 2019 या कालावधीत घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात 31 ऑगस्ट 2020 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पती राहुल महादेव सोनकांबळे (वय 34), सासू सुमन महादेव सोनकांबळे, सासरे महादेव सोनकांबळे, अमोल महादेव सोनकांबळे (चौघे रा. घाटकोपर, मुंबई), नणंद धम्मशीला धनाजी माने (रा. थेरगाव), वनमाला लक्ष्मण ससाणे (रा. थेरगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पती आणि दीर हे दोघेही पोलीस दलात कार्यरत आहेत. आरोपींनी आपसात संगनमत करून आरोपी राहुल यांच्या फिर्यादी पत्नीकडे जागा घेण्यासाठी माहेरहून पैसे आणण्याची मागणी करत त्यांना त्रास दिला. तसेच फिर्यादी यांच्या आई-वडिलांना शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. वारंवार विविध कारणांवरून टोमणे मारून फिर्यादी यांचा शारीरिक व मानसिक छळ केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.