जागतिक मंदीच्या विळख्यातून बाहेर पडणारी भारत ही पहिली अर्थव्यवस्था ठरेल….

0
389

शिमला, दि.२७ (पीसीबी) – भारत ही जागतिक मंदीच्या विळख्यातून बाहेर पडणारी जगातील पहिली अर्थव्यवस्था असेल, असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केला. ते शुक्रवारी शिमला येथील कार्यक्रमात बोलत होते. यावेळी अमित शहा यांनी देशातील उद्योजकांना आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी म्हटले की, सध्याच्या परिस्थितीत भारतामध्ये जागतिक मंदीचे तात्पुरते परिणाम आपल्याला दिसत आहेत.

मात्र, पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली निर्मला सीतारामन आणि अनुराग ठाकूर यांनी अहोरात्र मेहनत करून वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून ठोस असे धोरण तयार केले आहे. त्यामुळे लवकरच आपण या सगळ्यातून बाहेर पडू. किंबहुना भारत ही जागतिक मंदीतून बाहेर पडणारी पहिली अर्थव्यवस्था असेल, असा विश्वास यावेळी अमित शहा यांनी व्यक्त केला.