जर दोषींवर कठोर शासन नाही झाले तर महाराष्ट्र सरकारविरोधात आंदोलन करण्याचा अखिल भारतीय संत समितीने दिला इशारा

0
540

 

मुंबई, दि.२१ (पीसीबी) -पालघर प्रकरणानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेचं गरम झाले आहे. तर आता राज्य सरकारविरोधात साधू संघटनांनी आक्रमक पवित्रा घेत अखिल भारतीय संत समितीने थेट केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र लिहिले आहे.

संत समितीने जूना अखाड्याच्या साधूंची हत्या प्रकरणाची सीबीआय चौकशी करुन दोषींविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या हत्येमागे मोठं षडयंत्र असू शकतं असा दावाही त्यांनी केला आहे. अखिल भारतीय संत समितीकडून हे पत्र महामंत्री स्वामी जितेंद्र नंद सरस्वती यांनी लिहिलं आहे.

तसेच संपूर्ण प्रकरणात महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची भूमिका संशयास्पद आहे. त्यासाठी राज्य सरकारवर विश्वास ठेऊ शकत नाही. या घटनेवरील ट्विट एका बाजूचे वाटत असल्याने या प्रकरणाशी सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणीही या पत्रात केली आहे.

पालघरमध्ये दोन साधू आणि चालक यांच्या हत्येने महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. यापूर्वीच अखिल भारतीय अखाडा परिषदेने आंदोलनाचा इशारा दिला आहे. जर दोषींवर कठोर शासन नाही झाले तर महाराष्ट्र सरकारविरोधात आंदोलन करण्याचा पवित्रा घेण्यात आला आहे. तर अखिल भारतीय संत समिती जूना आखाडासोबत आहे. या प्रकरणी देशभरात आंदोलन करु असा इशारा त्यांनी दिला आहे.