जयंत पाटील यांच्या परिवरातील आणखी एका सदस्याला कोरोनाची लागण

0
457

सांगली, दि. १ (पीसीबी) : राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे मोठे सुपुत्र प्रतीक पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. प्रतीक पाटील यांनी स्वत: सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी जयंत पाटील यांनाही कोरोनाची लागण झाली होती. त्यापाठोपाठ प्रतीक पाटील यांनाही कोरोना झाला आहे.

“नमस्कार, माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. माझी तब्येत उत्तम असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी घरी विलगीकरणात आहे, काळजी नसावी, अशी माहिती प्रतीक पाटील यांनी दिली आहे. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी योग्य ती काळजी घ्यावी. मास्क, सॅनिटायझरचा नियमित वापर करावा,” असे आवाहनही प्रतीक पाटील यांनी केले आहे.

जयंत पाटील 18 फेब्रुवारीला कोरोनाची लागण झाली होती. जयंत पाटील हे सध्या मुंबईतील घरात क्वारंटाईन आहे. त्याच ठिकाणी ते उपचार घेत आहेत. त्यानंतर आता प्रतीक पाटील यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. प्रतीकही मुंबईत क्वारंटाईन असल्याचे सांगितले जात आहे.

“माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे मात्र तब्येत उत्तम आहे, काळजी करण्यासारखे काही नाही. डॉक्टरांचा योग्य सल्ला घेत आहे, लवकरच प्रत्यक्षात आपल्या सेवेत रुजू होईल. आपण माझ्या संपर्कात आले असल्यास, आपली कोरोना चाचणी करून घ्यावी अशी विनंती करतो. जितकं कामकाज व्हर्च्युअली करणे शक्य होईल सध्या तितके करण्याचा प्रयत्न करतो आहे. धन्यवाद” असे ट्विट जयंत पाटील यांनी केलं होतं.