जत नगरपालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादी-काँग्रेस आणि भाजप नगरसेवकांमध्ये तुंबळ हाणामारी

0
723

सांगली, दि. ५ (पीसीबी) – सांगलीच्या जत नगरपालिकेच्या मासिक सभेनंतर बुधवार (दि.४) नगरसेवकांमध्ये तुंबळ हाणामार झाली.

भररस्त्यात झालेली ही मारहाण पाहण्यासाठी दोन्ही गटाच्या नगरसेवक आणि ग्रामस्थांनी एकच गर्दी केली होती. अखेर नगरसेवकांनी मध्यस्थी करुन हा वाद मिटवण्यात आला.

सुरुवातीला जत नगरपालिकेतील सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे नगरसेवक आणि भाजपचे नगरसेवकांमध्ये शाब्दिक चकमक झाली. थोड्या वेळाने याचे रुपांतर हाणामारीत झाले. अखेर नगरसेवकांनी मध्यस्थी करुन हा वाद मिटवला. परंतु या हाणामारीमुळे पालिकेचे कामकाज बंद करण्यात आले होते.

यामुळे ऐन विधानसभा निवडणुकी आधी झालेल्या या प्रकारामुळे राज्यातले राजकारण चांगलेच तापण्याची चिन्ह आहेत.