छत्रपती संभाजीराजेंचे जागतिक स्मारकाची अजितदादामुळेच मुहूर्तमेढ

0
204

सलोखा बिघडवण्यापेक्षा स्वराज्यरक्षक संभाजी संबोधने योग्यच – काशिनाथ नखाते
अडवणूक न करता स्मारकाचे काम त्वरित सुरू करा.

पिंपरी चिंचवड दि.१ – छत्रपती संभाजीराजेंच्या दुर्लक्षित झालेल्या शौर्याच्या ,त्यागाचा, आणि पराक्रमाचा, दैदिप्यमान इतिहास भव्य इतिहास जनतेसमोर मांडन्यासाठी रू.२६९.३४ कोटी निधी देऊन जागतिक कीर्तीचे स्मारक हे अजितदादा पवार यांच्या संकल्पनेतून पुढे आले मात्र जाणीवपूर्वक काही लोक छत्रपती संभाजी महाराजांना धर्मवीर म्हणून जाती-जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचे काम करत आहेत छत्रपती शिवाजीराजे आणि संभाजीराजे यांनी अठरा पगड जाती-धर्माच्या लोकांना एकत्र करून आपले स्वराज्य निर्माण केलं जाती-जातीमध्ये वाद होण्यापेक्षा स्वराज्य रक्षक संभाजीराजे संबोधने योग्यच आहे. दुर्लक्षित संभाजीराजांचे स्मारक केवळ अजितदादांमुळे सुरुवात झाली असे मत कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी आज व्यक्त करत अजितदादा पवार यांच्या वक्तव्याचे,कार्याचे समर्थन केले.

नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी बोलताना विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार यांनी छ्त्रपती संभाजीराजे बाल शौर्य पुस्कार हा किमान स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीदिनी देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी करावी अशी मागणी करत छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक होते, त्यांनी कधीच धर्माचा पुरस्कार केला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. पण काहीजण जाणीवपूर्वक धर्मवीर उल्लेख करतात. मंत्रिमंडळात असतानाही त्यावेळी स्पष्ट सांगितलं होतं, संभाजी महाराजांचा उल्लेख हा स्वराज्यरक्षक असाच करावा असे म्हणत त्यांनी सर्वाँना सोबत घेऊन जाणारे राजे होते असा उच्चार केला. आता त्यास बरेच विरोध करत आहेत,मात्र त्यांनी लक्षात घ्यावे की दुर्लक्षित झालेले स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे जागतिक कीर्तीचे स्मारक वढू तुळापूर येथीलविकासाराखड्यासाठी २६९ • ३४ कोटी रुपयांचा भरीव निधी तत्कालीन अर्थमंत्री अजितदादा पवार अर्थसंकल्पात मंजुरी दिली ,मात्र राजकारण म्हणून छत्रपती संभाजीच्या स्मारकाचे काम थांबवण्याचे काम शिंदे -फडणवीस सरकारकडून करण्यात येत आहे . या कामाचे पुन्हा सादरीकरण करा म्हणून स्मारक गुंडाळण्याचा प्रयत्न होत आहे .हि अत्यंत दुर्दैवी गोष्ट असून हा छ. संभाजी राजेंचा घोर अपमान हे सरकार करत आहे .स्वराज्यासाठी छत्रपती संभाजी राजे यांनी बलिदान दिले ते बलिदान स्थळ म्हणजे शौर्य स्थळ तेथे मोठ्या अभिमानाने मराठी बांधवांचा अभिमान उंचावेल असे जागतिक कीर्तीचे स्मारक करन्याची मुहूर्तमेढ अजितदादा पवार यांच्या दूरदृष्टी तूनच झाली हे टीका करणानाऱ्यानीं लक्षात घ्यावे असेही नखाते नखाते यांनी नमूद केले. छत्रपती संभाजी राजे यांचा स्मारकरूपी इतिहास जागतिक स्मारकाचे काम लवकर सुरू न केल्यास लवकरच आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.