चोरी प्रकरणी तीन महिलांवर गुन्हा दाखल

0
398

चऱ्होली, दि. २७ (पीसीबी) – खरेदीच्या बहाण्याने सराफाच्या दुकानात आलेल्या तीन महिला चोरट्यांनी 33 हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना चऱ्होली येथे मंगळवारी (दि. 25) सायंकाळी घडली.

प्रशांत दत्तात्रय टकले (वय 35, रा. साई तिरूपती ग्रीन, चऱ्होली) यांनी मंगळवारी (दि. 25) याबाबत दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी टकले यांचे काळे कॉलनी, देहूफाटा आळंदी येथे वैष्णवी ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. मंगळवारी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास त्यांच्या दुकानात तीन महिला खरेदी करण्याच्या बहाण्याने आल्या. त्यांनी फिर्यादी टकले यांचे लक्ष विचलित करीत दुकानातील 33 हजार रुपये किंमतीचे चांदीचे दागिने चोरून नेले. पोलीस हवालदार कांबळे याबाबत अधिक तपास करीत आहेत.