चोराच्या उलट्या बोंबा , तडीपार आरोपीचीच पोलिसांना धमकी…

0
732

भोसरी, दि. २९ (पीसीबी) – तडीपार आरोपीने त्याच्यावर कारवाई करण्यासाठी आलेल्या पोलिसांना धक्काबुक्की करत बघून घेण्याची धमकी दिली. हा प्रकार मंगळवारी (दि. 28) दुपारी शांतीनगर, भोसरी येथे घडली.

 

 

रवींद्र बन्सीलाल भालेराव (वय 22, रा. लांडगेवस्ती, भोसरी) असे धमकी देणा-या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई सुमित देवकर यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड पोलिसांनी आरोपी रवींद्र भालेराव याला 26 मार्च 2021 रोजी दोन वर्षांसाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार केले होते. त्याचा तडीपारीचा कालावधी संपण्यापूर्वी तो शहरात आला. याबाबत पोलिसांना माहिती मिळाली असता भोसरी पोलीस त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी गेले. त्यावेळी आरोपीने पोलिसांना शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. तसेच तुमच्याकडे बघून घेतो, अशी धमकी दिली. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड तपास करीत आहेत