चॉकलेट आणि पैशांचे अमिश दाखवून 10 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार; 68 वर्षीय तो नराधम पोलिसांच्या ताब्यात

0
307

भोसरी, दि.३० (पीसीबी) – एका 68 वर्षीय नराधमाने 10 वर्षांच्या चिमुकलीला चॉकलेट आणि पैशांचे अमिश दाखवले. तिला आडबाजूला नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

सावन गंगाराम डोळस (वय 68, रा. भोसरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पीडित मुलीच्या आईने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (दि. 29) दुपारी तीन वाजताच्या सुमारास आरोपीने फिर्यादी यांच्या 10 वर्षीय मुलीला चॉकलेट व पैसे देण्याचे आमिष दाखवले. मुलीला आडबाजूला झाडामध्ये नेऊन तिच्याशी अश्लील चाळे केले. मुलीला मारण्याची धमकी दिली असल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.