चुलत्याकडून विनयभंग, त्रासाला कंटाळून अल्पवयीन पुतणीची आत्महत्या

0
410

भोसरी, दि. १२ (पीसीबी) – आईचा आरोप चुलत्यानेच अल्पवयीन पुतणीचा विनयभंग केला आणि नंतर वारंवार अश्लील मेसेज करू लागला. याच त्रासाला कंटाळून पुतणीने आत्महत्या केल्याचा आरोप आईने केलाय.पिंपरी चिंचवडच्या इंद्रायणीनगर परिसरात 6 सप्टेंबरला ही घटना घडली होती. गुन्हा मात्र 11 डिसेंबर म्हणजे काल दाखल झाला. एप्रिल 2018 मध्ये पीडित मुलगी औरंगाबाद येथील काकाकडे सुट्टीसाठी गेली होती. तेंव्हा काकाने पुतणीला छेडलं. म्हणून ती लगेचच पिंपरी चिंचवडमधील तिच्या घरी परतली.

मात्र काकाने तरी पिच्छा सोडला नाही. त्याने वारंवार अश्लील मेसेज करत त्रास देणं सुरूच ठेवलं, याच त्रासाला ती कंटाळली आणि म्हणूनच 6 सप्टेंबरला तिने राहत्या घराच्या गॅलरीतून उडी घेत आत्महत्या केली, असा आरोप करत आईने गुन्हा ही दाखल केला आहे. या प्रकरणी भोसरी पोलीस पुढील तपास करत आहेत.