चिनी मालावर बहिष्कार – देशातील सात कोटी व्यापाऱ्यांच्या शिखर संघटनेचा महत्वाचा निर्णय

0
404

पिंपरी, दि. १० (पीसीबी) – चीन मधून झालेला कोरोनाचा प्रसार तसेच देशाच्या सीमेवरील कुरघोडी पाहून देशातील सर्वसामान्य जनते बरोबरच आता व्यापाऱ्यांनीही चिनी मालावर थेट बहिष्कार टाकण्याचा महत्वाचा निर्णय केला आहे. कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (सीएआयटी) ही देशातील तब्बल सात कोटी व्यापाऱ्यांचे प्रतिनिधीत्व करणारी विविध ४० हजार व्यापारी संघटनांची शिखर संघटना आहे.

सीएआयटी या संघटनेने बुधवारी एक मोहीम हाती घेतली, त्यात चीनच्या वस्तूंवर बहिष्कार टाकून भारतीय बनावटीच्या वस्तुंना प्राधान्य द्यायचे ठरले. त्याचा फार मोठा झटका चीनला बसणार असून पहिल्याच झटक्यात सुमारे एक लाख कोटींची आयात तत्काळ बंद होईल आणि ती जागा देशातील वस्तुंना घेता येणार आहे. चीन मधून आयात होणाऱ्या ३००० अशा वस्तू पहिल्या टप्प्यात निवडण्यात आल्या आहेतत की जिथे लगेचच भारतीय वस्तू उपलब्ध होतील. अशा प्रकारे राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेचा चीनला व्यापारात मोठा फटका बसणार आहे.
संघटनेतील व्यापाऱ्यांनी या मोहिमेला थेट देशाभिमानाशी जोडले आहे. पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत या ध्येयाला पूरक अशी ही संकल्पना आहे. या मोहिमेला `इंडियन गुडस्-अवर प्राईड` असे विशेष नाव देण्यात आले आहे. या मोहिमेचा हेतूच डिसेंबर २०२१ पर्यंत चीन मधून होणारी आयात ही किमान एक लाख कोटीं रुपये पर्यंत कमी करणे हा आहे, असे संघटनेकडून सांगिण्यात आले.

सीएआयटी या संघटनेच्या व्हर्चुअल पत्रकार परिषदेत संघटनेचे जनरल सेक्रेटरी प्रविण खंडेलवाल म्हणाले, चीन मधून यात होणारा चार प्रकारचा माला आहे. त्याच पक्का माल, कच्चा माल, सुटे भाग आणि तंत्रज्ञान याचा समावेश आहे. संघटनेने ठरवले आहे की पहिल्या टप्प्यात पक्का मालाची चीन मधून होणारी आयात बंद करायची आहे. आजच्या घडिला भारत चीन मधून सुमारे सहा लाख कोटींचा (७० बिलियन) माल आयात करतो आहे.