चिखलीत सौदी अरेबीया येथे नोकरी लावण्याचे आमिष दाखवून पाच जणांची साडेचार लाखांची फसवणूक

0
766

चिखली, दि. २९ (पीसीबी) – सौदी अरेबीया येथे चांगल्या पगाराची नोकरी लावण्याचे आमिष दाखवून पाच जणांची ४ लाख ४३ हजारांची फसवणूक करण्यात आली आहे. ही घटना जून २०१६ ते जानेवारी २०१९ दरम्यान कुदळवाडी पवारवस्ती येथे घडली.

याप्रकरणी रियाझ रफिक कुरेशी (वय ३७, रा. गट नं.८११, पवारवस्ती चिखली, कुदळवाडी) याने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, परवेझ कायमुद्दीन अन्सारी (रा. काळभोरनगर, चिंचवड) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी परवेझ अन्सारी याने जून २०१६ ते जानेवारी २०१९ दरम्यान वेळोवेळी फिर्यादी रियाझ त्यांचा भाऊ, चुलभाऊ, दानिश कुरेशी आणि अशरफअली यांना सौदी अरेबीया येथे चांगल्या पगाराची नोकरी लावण्याचे आमिष दाखवून एकूण ४ लाख ४३ हजारांची फसवणुक केली. याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात परवेझ विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. चिखली पोलीस तपास करत आहेत.