चिखलीत सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

0
793

चिखली, दि. ३१ (पीसीबी) – जागा खरेदी करण्यासाठी माहेरहून पैसे आणले नाही म्हणून सासरकडच्या मंडळींनी विवाहितेचा छळ केला. या त्रासाला कंटाळून विवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवार (दि.२९) चिखलीतील धोंडीबा मोरे यांच्या चाळीत घडली.

कल्पना विठ्ठल कांबळे (वय २८, रा. चिखली धोंडीबा मोरे यांची चाळ) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात त्यांच्या आईने तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, पती विठ्ठल सोपान कांबळे (वय ३०),  दीर ज्ञानेश्वर सोपान कांबळे (वय २२) आणि नणंद आशामती भोसले (वय ३३) या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिेलेल्या माहितीनुसार, आरोपींनी कल्पना हिला २०१३ ते २०१९ या कालावधीत लहान सहान कारणावरुन तसेच माहेरहून जागा घेण्यासाठी पैसे आणण्याच्या कारणावरुन त्रास दिला. या त्रासाला कंटाळून तिने मंगळवार (दि.२९) राहत्या घराच्या छताला गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी पती, दीर आणि नणंदविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक घुगे तपास करत आहेत.