चिखलीत लघुशंकेसाठी थांबलेल्या इसमला लुटले; चोरट्यांनी दुचाकीसह मोबाईल आणि रोखही केली लंपास

0
885

भोसरी, दि. २० (पीसीबी) – लघुशंकेसाठी थांबलेल्या एखा इसमाला दोघा चोरट्यांनी धमकावून त्याच्याजवळील दुचाकी, मोबाईल आणि रोख रक्कम असा एकूण ६३ हजारांचा ऐवज जबरदस्तीने चोरुन नेला. ही घटना चिखली येथील स्पाईन रोडवर असलेल्या कचरा कुंडीजवळ घडली.

कमलेश बजरसिंग ठाकुर (वय ४१, रा. बि.ए. २०/७०६ लक्ष्मी पूर्ती हौसिंग सोसायटी, घरकुल चिखली) असे लुटण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दोन अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (दि.४ नोव्हेंबर) रात्री दीडच्या सुमारास चिखली येथील स्पाईन रोडवर असलेल्या कचरा कुंडीजवळ फिर्यादी कमलेश हे लघुशंकेसाठी थांबले होते. यावेळी दोन अज्ञात चोरटे त्यांच्या जवळ आले आणि त्यांनी कमलेश यांना धमकावले. तसेच त्यांची ६० हजार रुपये किमतीची दुचाकी, १ हजार २०० रुपयांचा मोबाईल आणि २ हजार रुपये रोख असा एकूण ६३ हजार २०० रुपयांचा ऐवज जबरदस्तीने चोरुन नेला. चिखली पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.