चिंचवड येथे डॉ.गिरीश आफळे आणि मोरेश्वर जोशी यांच्या पुस्तकांचे बुधवारी प्रकाशन

0
814

चिंचवड, दि.८ (पीसीबी) – भारतीय विचार साधना, पुणे प्रकाशन व स्व.दत्तोपंत म्हसकर सार्वजनिक विश्वस्त संस्था चिंचवड यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ.गिरीश आफळे लिखित “श्रीराम मंदिर ते राष्ट्र मंदिर” आणि मोरेश्वर जोशी लिखित “कारस्थान देशद्रोह्यांचे तुकडे भारताचे” या पुस्तकांचा प्रकाशन समारंभ बुधवार (दि.१० एप्रिल) सायंकाळी ७ च्या सुमारास चिंचवड येथील कल्याण प्रतिष्ठानचे सुखी भवन, काळेवाडी रस्ता केशवनगर शाळेजवळ आयोजित करण्यात आला आहे.

पुस्तक प्रकाशन समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून बांधकाम व्यावसायिक शंकर जगताप तसेच प्रमुख वक्ते म्हणून रा.स्व.संघ पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे बौद्धिक प्रमुख प्रसाद जोशी उपस्थित राहणार असून मान्यवरांच्या शुभहस्ते अयोध्येतील श्रीराम मंदिराच्य आंदोलनाचा अथ पासून ते इती पर्यंतचा इतिहास संक्षिप्त पणे कथन करणारे पुस्तक – “श्रीराम मंदिर ते राष्ट्र मंदिर” व ‘कारस्थान देशद्रोह्यांचे, तुकडे भारताचे” या दोन्ही पुस्तकांचा प्रकाशन सोहळा पार पडणार आहे.

या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन भारतीय विचार साधना पुणे प्रकाशन व स्व.दत्तोपंत म्हसकर सार्वजनिक विश्वस्त संस्था कार्यकारी मंडळाने केले आहे.