चिंचवड मतदारसंघात आमदार लक्ष्मण जगताप विरूद्ध संजोग वाघेरे लढतीची शक्यता

0
485

पिंपरी, दि. ७ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवडमध्ये लोकसभा निवडणूक निकालाच्या चर्चेसोबतच आगामी विधानसभा निवडणुकीत होणाऱ्या संभाव्य लढतींचीही सध्या जोरात चर्चा सुरू आहे. शहरातील पिंपरी, भोसरी आणि चिंचवड या तीन विधानसभा मतदारसंघातून कोण कोण निवडणूक लढणार याबाबत राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. चिंचवड विधानसभा मतदारसंघात भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी मजबूत बांधणी केलेली आहे. त्यांना तुल्यबळ लढत देण्यासाठी राष्ट्रवादीकडे चेहराच नसल्याचे पाहायला मिळते. राष्ट्रवादीकडून इच्छुक असलेले सर्वजण तोळामासा आहेत. अशा परिस्थितीत लोकसभा निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने थोडेसे नाराज असलेले शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांना चिंचवडमधून राष्ट्रवादीचे सर्वमान्य उमेदवार म्हणून उमेदवारी दिली जाऊ शकते, असे राजकीय जाणकारांचे मत आहे.