“चार घास सुखाचे” उपक्रमा अंतर्गत दररोज तीन हजार कष्टकरी कामगार व गरजुंच्या पोटाला आधार

0
249

 – कष्टकरी संघर्ष महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते यांचा स्तुत्य उपक्रम

पिंपरी दि.०९ ( पीसीबी) – कोरोना लॉकडाऊनच्या काळात कामगारांच्या हाताला काम आणि भुकेल्या पोटाला अन्न मिळत नसल्याने कष्टकरी कामगारांचे व गोरगरीब जनतेचे प्रचंड हाल होत असल्याने भुकेल्या जीवांचे पोट भरावे या सामाजिक भावनेतुन “चार घास सुखाचे” या उपक्रमाच्या माध्यमातुन दररोज शहरातील तीन हजार कष्टकरी कामगार व गरजुंना जेवणाचे डबे पोहचविण्याचे काम कष्टकरी संघर्ष महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते व त्यांचे सहकारी करत आहेत.

सध्या कोरोनाची दुसरी लाट असल्याने कामगारांच्या हाताला काम नाही, आणि हातालाच काम नसल्याने घरातील चुल पेटणार कशी ? असंघटित कामगार क्षेत्रातील बांधकाम कामगार, घरेलू कामगार, रिक्षाचालक, टपरी पथारी, दिव्यांग नागरिक व इतर गरजुंची भुक भागावी, त्यांच्या पोटाला आधार मिळावा यासाठी “चार घास सुखाचे” या स्तुत्य उपक्रमाला सुरुवात झाली गेल्या महिन्याभरापासुन शहरातील निगडी, आकुर्डी, चिंचवड, भोसरी, पिंपरी, काळेवाडी, नेहरूनगर, चिखली व इतर परिसरात मागणीनुसार एकुण दहा ठिकाणी दररोज तीन हजारांचे जेवणाचे डबे नित्यनेमाने पोहचविले जातात व थरमॅक्स चौकामध्ये याचे मुख्य केंद्र करण्यात आले आहे याठिकाणीही नागरिक चांगल्याप्रकारे याचा लाभ घेत आहेत, जेवणाचे डबे पोहचविण्यासाठी काही रिक्षाचालक व तरुण सहकारी काशिनाथ नखाते यांच्यासोबत खुप उत्साहाने काम करत आहेत.

वर्किंग पिपल चार्टर, कष्टकरी संघर्ष महासंघ व महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघातर्फे पुढील महीनाभर जेवणाचे हे वितरण होणार आहे. त्यामुळे या उपक्रमाचे सगळीकडुन कौतुक होत आहे. या उपक्रमास महाराष्ट्राचे पार्श्वगायक आनंद शिंदे, सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर, आशिष शिंदे, सह्याद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले, कवी सुरेश कंक, पिंपरी चिंचवड कुस्तीगीर परिषदेचे कार्याध्यक्ष काळुराम कवितके, संवाद प्रतिष्ठानचे अध्यक्ष हरीश मोरे, शिवसेना जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे यांनी सहभाग येथे सहभाग नोंदवला.

कष्टकरी संघर्ष महासंघाचे कार्याध्यक्ष महेश स्वामी, उपाध्यक्ष राजेश माने, माध्यम प्रमुख उमेश डोरले, प्रदेश संघटक अनिल बारवकर ,तुकाराम माने, सुरज देशमाने, महिला प्रमुख माधुरी जलमुलवार, विजया पाटील ,राणी माने, निरंजन लोखंडे ,धर्मेंद्र पवार शंकर साळुंके ,राजु बोराडे, अतिश वडमारे, संतोष मोरे
आदी परिश्रम घेत आहेत