चाकण येथे गुंगीचे औषध देवून अल्पवयीन तरुणीवर बलात्कार; आरोपी अटक

0
2825

चाकण, दि. २ (पीसीबी) – कंपनीत कामाला लावतो असे सांगून एका तरुणाला हॉटेलात नेऊन तिला गुंगीचे औषध दिले. त्यानंतर तिला चाकण एमआयडीसी येथील डोंगरावरुन नेऊन तिच्यावर बलात्कार केला. तसेच तिचे नग्न अवस्थेत फोटो काडून घडलेल्या प्रकाराबाबत कोणालाही काही सांगितल्यास फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. ही धक्क्दायक घटना मंगळवार (दि.४ डिसेंबर) ते रविवार (दि.९ डिसेंबर) दरम्यान चाकण पोलीस ठाणे हद्दीत घडली.

याप्रकरणी पीडित १७ वर्षीय तरुणीने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, भाग्यवान शांताराम डांगले (वय २२, रा. गडद, ता. खेड) या तरुणाला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिेलेल्या माहितीनुसार, पीडित १७ वर्षीय तरुणी आणि आरोपी भाग्यवान हे पूर्वी चाकण येथील एका कंपनीत कामाला होते. तेथेच त्यांची ओळख झाली होती. भाग्यवान याने तरुणीला दुसऱ्या कंपनीत चांगले काम लावून देतो असे सांगून एका हॉटेलात बोलवले. त्यानंतर त्याने तिला पाण्यातून गुंगीचे औषध दिले. काही वेळाने तरुणीला अशक्त वाटू लागल्याने. भाग्यवान ने तिला चाकण एमआयडीसी येथील डोंगरावर नेऊन तिच्यावर बलात्कार केला. तसेच तरुणीने नग्न अवस्थेतील फोटो काडून घडलेल्या प्रकाराबाबत कोणालाही काही सांगितल्यास फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. यामुळे घाबरलेल्या तरुणीने बरेच दिवस पोलीसात तक्रार दाखल केली नव्हती. मात्र घरच्यांना सांगितल्यानंतर तिने घरच्यांच्या मदतीने चाकण पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि.१) रोजी तक्रार दाखल केली. पोलिसांनी तातडीने तपास चक्रे फिरवत भाग्यवान डांगले याला अटक केली. पोलीस उपनिरीक्षक शिंदे अधिक तपास करत आहेत.