चाकण येथील कंपनीतल्या मशीनवरुन पडून कामगाराचा मृत्यू

0
520

चाकण, दि. २७ (पीसीबी) – कंपनीतल्या मशीनवर काम करत असताना एका कामगाराचा खाली पडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि.२६) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास चिंबळीफाटा येथील राधेशाम वेल्फर प्रा. लि या कंपनीत घडली.

शुभमकर नारायणचंद्र सरकार (वय २२, रा. चिंबळी फाटा, चाकण) असे मृत कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत शुभमकर हा चिंबळीफाटा येथील राधेशाम वेल्फर प्रा. लि या कंपनीत कामाला होता. रविवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास तो कंपनीतील मशीनवर काम करत तो अचानक खाली पडला. या घटनेत त्याच्या कंबरेला जबर मार लागला. कंपनीतल्या लोकांनी त्याला तातडीने चाकण येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. रात्री त्याची तब्येत अधिक बीगडल्याने त्याला पिंपरीतील व्हायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वी त्याचा मृत्यू झाला. चाकण पोलीस तपास करत आहेत.