चाकणमध्ये सुरु होता जुगार अड्डा; पोलसांना कळाले आणि…मोबाईल फोन, रोख रक्कमे सह ‘हे’ सुद्धा जप्त केले

0
355

चाकण, दि. २० (पीसीबी) – चाकण मधील तळेगाव चौकात एका इमारतीमध्ये सुरु असलेल्या कल्याण मटका अड्ड्यावर पिंपरी-चिंचवड सामाजिक सुरक्षा पथकाने छापा मारला. त्यात पोलिसांनी 92 हजारांचे साहित्य जप्त केले. ही कारवाई मंगळवारी (दि. 19) दुपारी अडीच वाजताच्या सुमारास करण्यात आली.

तळेगाव चौक, चाकण येथील राजाराम गवते बिल्डींग मध्ये कल्याण मटका अड्डा सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी मटका अड्ड्यावर छापा मारला. यात मटका चालक आणि मटका खेळणा-या एकूण आठ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कारवाईमध्ये पोलिसांनी चिठ्ठी, मोबाईल फोन, रोख रक्कम आणि एक दुचाकी असा एकूण 92 हजार 160 रुपयांचा ऐवज जप्त केला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.