चाकणमध्ये मुलीला नांदवत नसल्याने सासरकडच्या मंडळींना जबर मारहाण

0
464

चाकण, दि. २६ (पीसीबी) – मुलीला नांदवत नसल्याच्या रागातून मुलीच्या नातेवाईकांनी मुलाच्या नातेवाईकांना लोखंडी पाईप आणि काठ्यांनी मारहाण करुन जखमी केले. ही घटना बुधवारी (दि.२४) रात्री साडेआठच्या सुमारास रासे गावात घडली.

बिरबल गुलाब राठोड (वय ४८), पत्नी सावित्री, मुलगा अर्जुन आणि मुलगी सलीलता असे जखमी मुलाकडच्या मंडळींची नावे आहेत. याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार, मुलीकडची मंडळी गोविंद रंजित राठोड, विश्वास रंजित राठोड, लालु रंजित राठोड, रंजित उर्फ चिंचु दिपक राठोड (सर्व रा. राजेवाडी ता. पुरंदर) आणि त्यांच्या दोन अनोळखी साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास आरोपी मुलीकडील सहाजण हे बिरबल यांच्या घरात शिरले. तसेच त्यांच्या मुलीला का नांदवत नाही असा जाब विचारुन बिरबल त्यांची पत्नी सावित्री, मुलगा अर्जुन आणि मुलगी सलीलता या सर्वांना लोखंडी पाईप आणि काठ्यांनी मारहाण करुन जखमी केले. याप्रकरणी या सर्वांवर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण पोलीस तपास करत आहेत.