चाकणमध्ये दोघांना दगडाने मारहाण करुन तोडला दात

0
462

चाकण, दि. २७ (पीसीबी) – उसाचा रस पिण्यासाठी रस्त्याच्या कडेला थांबलेल्या दोघा मित्रांना दुचाकी धडकवली. याचा जाब विचारल्याने चौघाजणांनी या दोघांना दगडाने जबर मारहाण केली. तर एकाचा दात तोडला. ही घटना गुरुवार (दि.२५) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास मुटकेवाडी मेदनकरवाडी गावाच्या हद्दीत आय.आय.कंपनीसमोर घडली.

याप्रकरणी विनोद साहेबराव ठाकरे (वय २६, रा. मुटकेवाडी केअर ऑफिस फेअर फिल्ड, चाकण) याने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, गणेश हुळवळे, सुरज तांबे आणि त्यांच्या दोन अनोळखी साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास मुटकेवाडी मेदनकरवाडी गावाच्या हद्दीत आय.आय.कंपनीसमोरील हातगाडीवर फिर्यादी विनोद ठाकरे आणि त्यांचा मित्र जितेंद्र श्रीनिवास हे दोघे उसाचा रस पिण्यासाठी थांबले होते. यावेळी दुचाकीवरुन भरधाव वेगाने आलेल्या गणेश,  सुरज आणि दोन साथीदारांनी विनोदच्या दुचाकीला धडक दिली. तसेच त्याच्या अंगावर आले. यावर विनोदने त्यांना याचा जाब विचारला असता आरोपींनी विनोद आणि त्याचा मित्र जितेंद्र या दोघांना दगडाने मारहाण केली. तसेच जितेंद्र याचा दात पाडून जखमी केले. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. चाकण पोलीस तपास करत आहेत.