चाकणमध्ये अल्पवयीन तरुणीचा विनयभंग

0
1134

चाकण, दि. २० (पीसीबी) – अल्पवयीन तरुणीचा हात पकडून शरीर सुखाची मागणी करत विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना शुक्रवार (दि.१४) ते बुधवार (दि.१९) दरम्यान चाकण पोलीस ठाणे हद्दीतील गडद येथील घरात आणि राणात घडली.

याप्रकरणी पीडित १७ वर्षीय तरुणीने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, संतोष रामभाऊ शिंदे (रा. गडद, ता. खेड, जि. पुणे) या इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी ही गडद येथे राहते. शुक्रवार ते बुधवार दरम्यान आरोपी संतोष शिंदे याने वेळोवेळी तरुणीचा पाठलाग करुन रानात आणि तिच्या घरी जाऊन हात पकडत तरुणीकडे शरीर सुखाची मागणी केली. अश्लिलतेचा कळस म्हणजे आरोपी ने तिला निरोध दाखवून विनयभंग केला. आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. चाकण पोलीस अधिक तपास करत आहेत.