“घरी जाण्यासाठी पाहत होता वाहनाची वाट…पण काळाने केला घात”

0
357

पिंपरी, दि. 22 (पीसीबी) – घरी जाण्यासाठी शेलारवाडी फाटा, देहूरोड येथे वाहनाची वाट पाहत थांबलेल्या व्यक्तीला भरधाव वेगात आलेल्या दुचाकीने जोरात धडक दिली. यामध्ये वाहनची वाट पाहत थांबलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला.

शिवाजी दत्तात्रय शिंदे (वय 32, रा. साने चौक, चिखली) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत त्यांचा भाऊ सोमनाथ दत्तात्रय शिंदे (वय 30, रा. बावी, ता. वाशी, जि. उस्मानाबाद) यांनी शनिवारी (दि. 21) देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एम एच 12 / आर इ 5580 या क्रमांकाच्या दुचाकीस्वराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सोमनाथ यांचा मोठा भाऊ शिवाजी 28 ऑक्टोबर रोजी रात्री अकरा वाजता घरी येण्यासाठी शेलारवाडी फाटा, देहूरोड येथे वाहनाची वाट पाहत थांबले होते. त्यावेळी आरोपी दुचाकीस्वराने भरधाव वेगात दुचाकी चालवून शिवाजी यांना जोरात धडक दिली. यामध्ये शिवाजी गंभीररीत्या जखमी झाले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. अपघात घडल्यानंतर अपघाताची माहिती न देता दुचाकीस्वार पळून गेला. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.