घरातून झाले लाखोंचे दागिने आणि बरच काही गायब; एका संशयितावर गुन्हा दाखल कारण…

0
272

थेरगाव, दि. ३० (पीसीबी) – घरातून चोरट्याने एक लाख 47 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली. याबाबत एका संशयिताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवारी (दि. 26) रात्री साडेअकरा ते शनिवारी (दि. 27) रात्री साडेआठ या कालावधीत बेलठीकानगर, थेरगाव येथे घडली.

सिराज अहमद अब्दुलवफाक खान (वय 41, रा. बेलठिकानगर, थेरगाव. मूळ रा. उत्तर प्रदेश) यांनी याबाबत वाकड पोलीस ठाण्यात सोमवारी (दि. 29) फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या घरातील कपाटातून एक लाख 47 हजार रुपये किमतीचे 55 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरट्याने फिर्यादी यांच्या नकळत चोरून नेली. फिर्यादी यांचा अलिमुल्ला खान (रा. बेलठिकानगर) याच्या विरोधात संशय आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.