ग्रीनलँडच्या आकाराचा हिमनग अंटार्क्टिकामधून गायब…!

0
439

विदेश,दि.०२(पीसीबी) – 2 महिने सदैव बर्षाच्छादित असलेला देश म्हणून ग्रीनलँड भाग माहित आहे. एवढंच नाही तर जगातील सर्वात मोठे बर्फाच्छादित बेट अशीही या ग्रीनलॅडची एक वेगळी ओळख आहे. याच ग्रीनलँडच्या आकाराचा हिमनग हा अंटार्क्टिकामधून गायब झाला आहे. हिमनग समुद्रात वितळल्याची भिती व्यक्त केली जात आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे अंटार्टिकामधील बर्फ झपाट्यानं वितळतोय. अंटार्क्टिकामधील पश्चिम भागातील रोन्ने आईस सेल्फमध्ये असणारा हा महाकाय हिमनग वितळला आहे. हा महाकाय हिमनग वितळल्याने चिंता पसरली आहे.

अंटार्क्टिकामध्ये यंदा विक्रमी बर्फ वितळल्याचा दावा एका अहवालात करण्यात आला आहे. दरवर्षी उन्हाळ्यात फेब्रुवारीच्या उत्तरार्धात अंटार्क्टिकाचा समुद्राचा बर्फ वितळतो. यानंतर हिवाळ्यात पुन्हा बर्फ गोठतो. यंदा मात्र, समुद्रातील बर्फ अपेक्षित पातळीच्या जवळपास गोठलेला नाही असे निरीक्षणात समोर आले आहे. ग्लोलब वार्मिंग आणि वाढत्या तापमानाचा जबरदस्त परिणाम हा अंटार्क्टिकामध्ये पहायला मिळत आहे.

अंटार्क्टिकामध्ये मोठ्या प्रमाणात बर्फ वितळत असल्याने ही जगासाठी धोक्याची घंटा असल्याची चिंता अभ्यासकांनी व्यक्त केली आहे. कारण, दरवर्षी उन्हाळ्याच्या काळांत बर्फ वितळल्याने 55 अब्ज टन पाणी हे समुद्रात वाहून जाते. मात्र, बर्फ वितळण्याचे प्रमाण वाढल्याने 55 अब्ज टनापेक्षा कितीतरी जास्त प्रमाणात पाणी हे समुद्रात वाहून आले आहे. परिणमी समुद्राच्या पाणी पातळीत वाढ आहे. बर्फ वितळण्याचा वेग असाच राहिला तर समुद्रातील पाण्याची पातळीत धोकादायकरित्या वाढ होईल. किनाऱ्यालत असलेल्या देशांसाठी हे निश्चितच धोकादायक ठरू शकते. संपूर्ण जगात प्रदूषणाचे प्रमाण वाढत आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात धूलिकण, प्रदूषित कण हे ग्रीनलँडच्या विस्तृत बर्फाच्छादित भागावर पसरले जात आहेत. या कणांमुळे उष्णता शोषून घेण्याचे प्रमाण वाढले असल्याने बर्फ वितळत असल्याचं अभ्यासकांचे म्हणणे आहे.

या वर्षी जुलैच्या मध्यात अंटार्क्टिकाचा समुद्रातील बर्फ 1981-2010 च्या सरासरीपेक्षा 2.6 दशलक्ष चौरस किलोमीटरपेक्षा कमी होता. या क्षेत्राचे अंदाजे आकारमान हे अर्जेंटिना किंवा टेक्सास, कॅलिफोर्निया, न्यू मेक्सिको, ऍरिझोना, नेवाडा, उटाह आणि कोलोरॅडोच्या एकत्रित प्रदेशाइतके मोठे आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात बर्फ वितळल्याची 45 वर्षांतील ही पहिलीच वेळ आहे

शास्त्रज्ञांचे निरिक्षण –
या घटनेचे वर्णन काही शास्त्रज्ञांनी असामान्य असे केले आहे. लाखो वर्षांनंतर अशी घटना पाहायला मिळते, असे ते म्हणाले. कोलोरॅडो बोल्डर विद्यापीठातील ग्लेशियोलॉजिस्ट टेड स्कॅम्बोस यांनी सांगितले की, ही साधी घटना नाही. हवामान सतत बदलत आहे. शास्त्रज्ञ आता हे का होत आहे हे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. अंटार्क्टिकामधील वाढत्या हवामान संकटामुळे समुद्रातील बर्फ सतत वितळत आहे. अंटार्क्टिकामधील समुद्रातील बर्फ गेल्या काही दशकांमध्ये विक्रमी उच्चांकावरून विक्रमी नीचांकी पातळीवर घसरला आहे, ज्यामुळे शास्त्रज्ञांना जागतिक तापमानवाढीला कसा प्रतिसाद मिळतो हे समजणे कठीण झाले आहे.