गोविंद पानसरे हत्येप्रकरणी अमित दिगवेकर याला अटक

0
469

कोल्हापूर, दि. १५ (पीसीबी) – कॉम्रेड गोविंद पानसरे हत्येप्रकरणी विशेष तपास पथक (एसआयटीने) आज (मंगळवार) एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.

अमित दिगवेकर असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायाधिशांनी त्याला ९ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

याआधी अमित याला गौरी लंकेश आणि दाभोलकर हत्येप्रकरणी अटक केली होती. मात्र, त्याचा ताबा कोल्हापूर एसआयटीला मिळत नव्हता. पण बंगळुरू न्यायालयाच्या परवानगीनंतर अमितला कोल्हापूर एसआयटीच्या ताब्यात देण्यात आले होते.