गृह अतिक्रमण केल्याप्रकरणी दीर आणि जावे विरोधात गुन्हा दाखल

0
277

पिंपळे गुरव, दि. ४ (पीसीबी) – फ्लॅटमध्ये अतिक्रमण करून भाडेकरू ठेवला. त्यानंतर फ्लॅटची मागणी केली असता महिलेला दीर आणि जावेने शिवीगाळ करत मारहाण केली. ही घटना सन 2009 पासून तीन ऑगस्ट 2021 या कालावधीत पिंपळे गुरव येथे घडली.

खलील मणियार, महिला आरोपी (दोघे रा. पिंपळे गुरव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सदफ शफिक मणियार यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सीएमई काॅलनी, मोरया अपार्टमेंटमध्ये पहिल्या मजल्यावरून फ्लॅट नंबर दोन हा फिर्यादी यांच्या पतीच्या नावावर आहे. आरोपी दीर आणि जाऊ यांनी त्या फ्लॅटमध्ये भाडेकरू ठेवला. भाड्यापोटी आलेली रक्कम स्वतः घेतली. फिर्यादी यांनी आरोपींकडे फ्लॅटची मागणी केली असता त्यांच्याशी वाद घालून शिवीगाळ करत हाताने मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.