गिरीश महाजनांची पूरपाहणीच्या नावाखाली मौजमज्जा; व्हिडिओ व्हायरल

0
490

कोल्हापूर, दि. ९ (पीसीबी) – एकीकडे कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात पुराने हैरान झालेल्या नागरिकांची दैनिय अवस्ता झाली आहे. तर दुसरीकडे पुरग्रस्तांची मदत करण्यासाठी गेलेले जलसंपदामंत्री गिरीश महाजन तेथे हसत सेल्फी व्हिडिओ काढत असल्याचे  समोर आले आहे. या घटनेचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे.

हा व्हिडीओ कोल्हापुरमधील असून गिरीश महाजन पोलीस आणि इतर अधिकाऱ्यांसोबत बोटीत बसून पुराची पाहणी करताना दिसत आहेत. यावेळी एक व्यक्ती हातात मोबाइल घेऊन सेल्फी व्हिडीओ काढताना दिसत आहे. या व्हिडीओत आपण फ्रेममध्ये आल्यानंतर गिरीश महाजन हसत हात हलवताना दिसत आहे. पुराच्या ठिकाणी अशा पद्धतीने हसून दाद दिल्याने गिरीश महाजन यांच्यावर टीका होत आहे. यामुळे नेत्यांमधील संवेदनशीलता खरंच हरवली आहे का असा प्रश्न यानिमित्ताने विचारला जात आहे.