गाडगेबाबा महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त केशवनगर येथे स्वच्छता अभियान

0
652

चिंचवड, दि. २० (पीसीबी) – राष्ट्रसंत गाडगेबाबा महाराज यांच्या ६२ व्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त राष्ट्रसंत गाडगे बाबा सेवाभावी संस्था व  शिवगर्जना ग्रुप यांच्या वतीने चिंचवडमधील केशवनगर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

गाडगे महाराज यांच्या प्रतिमेची मान्यवरांच्या हस्ते पूजा करून जयघोष करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. संत गाडगे बाबा चौक व काकडे टाऊन शिप परिसरात स्वच्छता अभियान राबवण्यात आले. त्यानंतर महापालिकेमध्ये संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी नगरसेवक राजेंद्र गावडे, महाराष्ट्र महावितरण समितीचे सदस्य मधुकर बच्चे,  नरेश कदम, किरण लोंढे  दिलीप शिंदे, सुनील अभंग, प्रशांत दळवी, आकाश जवळकर,  राष्ट्रसंत गाडगेबाबा सेवाभावी संस्थेचे सभासद ,व नागरिक उपस्थित होते.

मधुकर बच्चे  यांनी संत गाडगे महाराजांबद्दल मनोगत व्यक्त केले. संस्थेचे अध्यक्ष नरेश कदम यांनी प्रास्ताविक केले. उपाध्यक्ष किरण लोंढे यांनी स्वागत केले. सचिव सुनील अभंग यांनी आभार मानले.