गांधींच्या प्रतिमेला गोळ्या घालणाऱ्या पूजा पांडेयला अटक

0
819

नवी दिल्ली, दि. ६ (पीसीबी) –  राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीला त्यांच्या प्रतिमेवर गोळ्या झाडणाऱ्या पूजा पांडेय आणि तिचा पती अशोक पांडेय यांना  दिल्ली-नोएडा सीमेवर  अलीगढ पोलिसांनी  अटक केली.

उत्तर प्रदेशातील अलीगढमध्ये महात्मा गांधींच्या ७१ व्या पुण्यतिथीला ३० जानेवारीला  पूजा पाण्डेय हिने महात्मा गांधींचा अवमान केला होता. पूजा ही हिंदू महासभेची राष्ट्रीय सचिव आहे.

दरम्यान, नथुराम गोडसेने गांधीजींना जितक्या गोळ्या घातल्या, तितक्याच गोळ्या पूजा पाण्डेयने घातल्या होत्या.  याशिवाय हत्या खरी वाटावी म्हणून विकृतांनी प्रतिमेखाली रक्तही ओतले होते. त्यानंतर महात्मा गांधींची प्रतिमा या विकृतांनी पेटवून दिली. ज्या नथुरामने महात्मा गांधींची हत्या केली, त्याचा जयजयकारही यावेळी करण्यात आला.