गरोदर महिला कर्मचाऱ्यांना सुट्टी द्या – नगरसेविका सीमा सावळे यांची मागणी, पोलिस आयुक्त, महापालिका आयुक्ताना निवेदन

0
661

पिंपरी, दि. २९ (पीसीबी) कोरोनाचा प्रसार रखण्यासाठी सुरू असलेल्या टाळेबंदित सरकारी सेवेतील ज्या महिला गरोदर अथवा अन्य मोठी शस्त्रक्रीया झालेल्या असतील त्यांना मुभा द्यावी अशी मागणी भाजपाच्या जेष्ठ नगरसेविका सीमा सावळे यांनी केली आहे. पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई आणि महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना त्या संदरर्भातील एक निवेदन त्यांनी दिले.

निवेदनात म्हटले आहे की, सद्या कोरोनाच्या टाळेबंदीत डॅक्टर, पोलिस, नर्स, सर्वेक्षण करणाऱ्या शिक्षिका मोठ्या संख्येने सेवेत आहेत. धोका पत्करून केवळ सेवाभावी वृत्तीने या सर्वजण काम करतात. ज्या महिला गरोदर आहेत त्यांच्या बाबतीत मोठी जोखीम घेणे बरोबर वाटत नाही. अलिकडे काही उदाहरणे समोर आली आहेत. त्यात पोटातील मुलाला सुध्दा बाधा पोहचण्याची शक्यता गृहीत धरण्यात आली आहे. या महिला सेवा बजावताना कुठेही प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कोरोना रुग्णांच्या संपर्कात आल्या तर धोका संभवतो. त्यासाठी या महिलांना सरळ सुट्टी द्यावी अथवा दुसरा पर्याय म्हणजे त्यांना सोयिस्कर असे हलके काम द्यावे. शक्य असल्यास घरून काम करण्याची मुभा द्यावी. काही महिला या मधुमेह, रक्तदाब किंवा अन्य मोठ्या आजाराने पिडीत आहेत. त्यांच्यासाठी सुध्दा ही मोठी जोखीम आहे. त्यांचाही सहानुभूतीने विचार केला पाहिजे, असे सावळे यांनी निवेदनात म्हटले आहे.