गंभीरनं घरकाम करणाऱ्या महिलेचे स्वतः अंत्यसंस्कार केले

0
407

 

दिल्ली, दि.२४ (पीसीबी) – देशभरात कोरोनाने थैमान घातले आहे. ३ मे पर्यंत कडक लॉकडाऊन राहणार आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले. त्याचवेळी मोदींनी स्वतःची, कुटुंबाची तसेच कामगारांची काळजी घेण्यास सांगितले आहे. तर अडचणीत असणाऱ्यांना मदत करावे, असे आवाहन केले आहे.

पंतप्रधान मोदींच्या याचं आवाहनाचे पालन करत भारताचा माजी क्रिकेटपटू आणि सध्याचा भाजप खा. गौतम गंभीर याने केले आहे. गौतम गंभीरच्या घरी घरकाम करणाऱ्या महिलेचे नुकतेच निधन झाले. याची माहिती गंभीरनं ट्विटरवरून दिली. इतकेच नाही, तर गंभीरनं घरकाम करणाऱ्या महिलेचे स्वतः अंत्यसंस्कार केले.