खासदार प्रितम मुंडेंच्या इंग्रजीतील प्रश्नाला मंत्री स्मृती इराणींचे मराठीतून उत्तर  

0
594

मुंबई, दि. २९ (पीसीबी) – मराठवाड्यातील शेतकऱ्यांचा प्रश्न बीडच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी संसदेत उपस्थित केला. मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून विशेष मदत मिळावी, अशी मागणी  खासदार मुंडे यांनी लावून धरली. तसेच यावर  वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांनी  उत्तर देण्याची मागणी केली.

शेतकऱ्यांना केंद्राकडून मदत मिळावी, अशा मागणी खासदार  मुंडे यांनी  इंग्रजी मधून केली.  मात्र त्यावर स्मृती इराणी म्हणाल्या की, मला देखील मराठी येते. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या समस्या मला  माहीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना निश्चितच मदत करण्यात येईल, असे आश्वासन दिले.

यावेळी स्मृती इराणी म्हणाल्या की, मला देखील मराठी येते. परंतु, मुंडे यांनी इंग्रजीत बोलण्याचा निर्णय घेतला ती चांगली गोष्ट आहे. नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी वस्त्रोद्योग खाते प्रयत्नशील आहे. त्यासाठी प्रितम मुंडे यांनी वस्त्रोद्योग मंत्रालायाच्या संपर्कात राहावे, असेही स्मृती इराणी यांनी सांगितले.