खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांना कोरोनाची लागण

0
223

सातारा, दि. १८ (पीसीबी) : खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या आईला कोरोनाची लागण झाली. त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांची प्रकृती बरी आहे. दरम्यान, आता उदयनराजे भोसले यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर पुण्यातील घरी उपचार सुरू आहेत.

दिल्ली येथील लोकसभेचे पावसाळी अधिवेशन आटोपून पुणे येथे आल्यानंतर खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांना अस्वस्थ वाटू लागले होते. त्यांना पुणे येथील खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. चार दिवस त्यांच्यावर उपचार झाल्यानंतर त्यांची प्रकृती ठणठणीत झाल्याची माहिती त्यांच्या समर्थकांकडून देण्यात आली. दरम्यान, उदयनराजे यांच्या आई राजमाता कल्पनाराजे यांनाही कोरोनाची लागण झाली होती.
त्याआधी उदयनराजे भोसले यांनी कोरोनाच्या काळात दुकाने सुरु करावीत तसेच लोकांची विनाकारण अडवणूक करु नये, यासाठी भीकमांगो आंदोलन केले होते. कोरोनाच्या काळात प्रशासनाने घेतलेल्या भूमिकेलाही त्यांनी विरोध केला होता. मात्र, दरम्यानच्या काळात उदयनराजे भोसले यांना कोरोना सदृश्य लक्षणे दिसून आली आहेत. गेल्या चार दिवसांपासून ते पुण्यात उपचार घेत आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांना पुढील काही दिवसात डिस्चार्ज मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

उदयनराजे यांना कोरोनाची लागण झाल्याबाबत सोशल मीडियावर बातम्या व्हायरल होत होत्या. त्यानंतर त्यांच्या समर्थकांकडून ही माहिती देण्यात आली. गेल्या चार दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.खासदार उदयनराजे भोसले यांच्या मातोश्री कल्पनाराजे भोसले या कोरोना बाधित झाल्या होत्या. त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यामुळे उदयनराजे भोसले अधिवेशन सोडून परतले होते. त्यांच्या प्रकृती आता बरी आहे.