खासगी बसच्या धडकेत एकाचा मृत्यू; बसचालकाला अटक

0
249

पिंपरी,दि.२१(पीसीबी) – रस्त्याने जात असलेल्या एकाला खासगी बसने धडक दिली. त्यामध्ये त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. 18) रात्री सव्वासात वाजता नाशिक फाटा बस थांबा, कासारवाडी येथे घडली. पोलिसांनी आरोपी बस चालकाला अटक केली आहे.

आनंद मंगलचंद राउत (वय 40, रा. चिंचवडगाव) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी आनंद यांचे नातेवाईक राहुल नरेंद्र रुखणे (वय 42, रा. पुणे) यांनी गुरुवारी (दि. 20) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सुभाष श्रीधर गुंजाळ (वय 28, रा. मोहननगर, भोसरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या बहिणीचे पती मयत आनंद मंगळवारी रात्री सव्वा सात वाजता कासारवाडी येथील नाशिक फाटा बस थांब्याजवळून जात होते. त्यावेळी भरधाव वेगात आलेल्या एका खासगी बसने (एम एच 12 / सी टी 0895) त्यांना धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या आनंद यांचा मृत्यू झाला.
आनंद यांचा अंत्यविधी केल्यानंतर गुरुवारी याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी बसचालक सुभाष गुंजाळ याला अटक केली आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.