खळबळजनक! मुलीचे अपहरण करून महसूल अधिकाऱ्यासह दोघांनी चालत्या कारमध्ये केला बलात्कार

0
462

लखानौ, दि. १० (पीसीबी) – ठळक मुद्देया जिल्ह्यात तैनात असलेल्या लेखपालाविरोधात अपहरणानंतर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेच्या तक्रारीच्या आधारे सुशील पटेल आणि त्याच्या दोन साथीदारांविरोधात भा. दं. वि. कलम 376बी, 323, 504, 364 आणि एससीएसटी कायद्याच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बांदा (उत्तर प्रदेश) – एका 18 वर्षीय मुलीला चालत्या कारमधून महसूल अधिकारी व दोन इतरांनी अपहरण केले आणि तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप पोलिसांकडे पीडित महिलेने मंगळवारी केला. ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमधील बांदा जिल्ह्यात घडली आहे. या जिल्ह्यात तैनात असलेल्या लेखपालाविरोधात अपहरणानंतर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लेखपाल नरैनी कोतवालीतील पोलिस स्टेशन अंतर्गत पुंगरी गावात तैनात होता. कोतवाली येथे पीडित मुलीने सोमवारी दाखल केलेल्या एफआयआरनुसार प्रभारी पोलीस निरीक्षक गिरिंद्र सिंह यांनी मंगळवारी सांगितले की, शनिवारी सकाळी सहाच्या सुमारास 18 वर्षीय मुलीसोबत ही घटना घडली होती, परंतु त्यानंतर दोन दिवसांनी सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला.

शनिवारी मुलगी दारात कचरा साफ करत होती, पुखरी गावात तैनात लेखपाल (महसूल कामगार) सुशील पटेल, दोन साथीदारांसह त्याच्या जीपमधून आला आणि मुलीला जबरदस्तीने जीपमध्ये टाकून नेले. मुलीच्या आईने तिला वाचविण्याचा प्रयत्न केला, परंतु तिला ढकलून देऊन खाली खाली पाडण्यात आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “पीडित मुलीने तिच्या तक्रारीत लेखपालाने तिच्यावर चालत्या जीपमध्ये बलात्कार केला आणि हनुमान मंदिराजवळ रस्त्यावर जीप थांबली तेव्हा तिने जीपमधून उडी मारुन पळ काढला.” पीडितेच्या तक्रारीच्या आधारे सुशील पटेल आणि त्याच्या दोन साथीदारांविरोधात भा. दं. वि. कलम 376बी, 323, 504, 364 आणि एससीएसटी कायद्याच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि आरोपींना अटक करण्यासाठी पोलीस तैनात करण्यात आले आहेत. तसेच पीडितेला वैद्यकीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.