कोरोना लस सर्वप्रथम कोणाला प्रथम देणार…

0
362

नवी दिल्ली, दि. १२ (पीसीबी) – कोरोनावरील लस देण्याची  संभाव्य प्रक्रिया व नियमांबाबत चर्चा करण्यासाठी नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांच्या नेतृत्वाखालील तज्ज्ञ समितीची बैठक बुधवारी होणार आहे. त्यात कोविड १९ लस उत्पादन, पुरवठा व्यवस्था व इतर नैतिक बाबींवरही उहापोह करण्यात येईल.

लस देण्याच्या वेळी कुणाला अग्रक्रम द्यायचा, लशीचा पुरवठा कसा असेल अशा अनेक बाबींवर ही समिती विचार करणार आहे. राज्ये, लस उत्पादककंपन्या यांच्याशीही समिती चर्चा करणार आहे. लसनिर्मितीनंतर ती कुणाला आधी द्यायची, शीतेपटय़ांची व्यवस्था कशी करायची, लस टोचणाऱ्यांना प्रशिक्षण कसे द्यायचे याचा विचार आधीच करण्याचे समितीने ठरवले आहे.

जगात सर्व प्रथम रशियाने कोरोना लस तयार करून त्याची नोंदी केली. रशियाचे अध्यक्ष ब्लादिमर पुतिन यांनी त्याबाबतची घोषणा केली. त्यामुळे रशियन जनतेला मोठा दिलासा मिळाला. आता भारत आणि अमेरिका त्या वाटेवर आहेत. सीरम इन्स्टिट्यूट च्या लसीबाबत अंतम चाचणी बाकी आहे. दुसऱ्या एका कंपनीची लस तत्पूर्वी येऊ घातली आहे. कदाचित परवा देशाच्या स्वातंत्र दिनाचा मुहूर्त साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याची घोषणा करतील. शासकीय पातळीवर त्या दृष्टीने जोरदार हालचाल सुरू आहे. त्यासाठीच भारतात १३५ कोटी लोकसंख्येमध्ये सर्वप्रथम लस कोणाला द्यायची याचे धोरण निश्चित करण्याची गरज आहे. आज त्याबाबत निर्णय होईल, असे सरकारी सुत्रांनी सांगितले.