कोरोना लस चाचणी पहिला टप्पा हरियाणात यशस्वी

0
243

मुंबई, दि. २७ (पीसीबी) : कोरोनावर मात करण्यासाठी  भारत बायोटेक निर्मित कोव्हॅक्सिनचा पहिला टप्पा पार पडला आहे. कोरोना संक्रमणावर यशस्वीरित्या पहिला टप्पा पार पडला. कोरोना लस चाचणीचा हरियाणाच्या रोहतकमध्ये पहिला टप्पा यशस्वीरित्या पार पडला. 50 लोकांना ही लस देण्यात आली होती, अशी माहिती रोहतकच्या मेडिकल विभागच्या प्रमुख डॉ. सविता वर्मा यांनी दिली आहे. कोवॅक्सिनची पहिल्या लस चाचणीमध्ये कुठलाही अडथळा आला नाही. 50 लोकांना लस दिली आहे, हे सर्व लोक बरे आहेत.

भारत बायोटेक कंपनीकडून कोरोनाची पहिली लस तयार

भारत बायोटेक कंपनीने पहिल्यांदा कोरानाची लस तयार केली. या लसीला केंद्र सरकारकडून मानवी चाचणीसाठी परवानगीही मिळाली. त्यानंतर आता या लसीच्या मानवी चाचणीची प्रक्रियेचा पहिला टप्पाही यशस्विरित्या पार पडला आहे. भारत बायोटेक कंपनीने आयसीएमआर आणि नॅशनल इन्स्स्टिट्यूट ऑफ विरोलॉजी यांच्यासोबत मिळून ही लस तयार केली आहे.

भारत बायोटेक कंपनीने तयार केलेल्या लसीचं नाव कोवॅक्सिन (Covaxin) असं आहे. सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (सीडीएससीओ), आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने या लसीच्या पहिल्या आणि दुसर्‍या टप्प्यातील क्लिनिकल चाचण्यांना मान्यता दिली.

जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनावर लस तयार करण्यासाठी हजारो वैज्ञानिक आणि संशोधक काम करत आहे. जगातील बहुतेक देश लसीचं काम करत आहेत. जगभरात 100 पेक्षा जास्त वैज्ञानिक संस्था या कामात अहोरात्र मेहमत घेत आहेत. भारतातही अनेक वैज्ञानिक आणि संशोधक प्रयत्न करत आहेत. यादरम्यान, भारत बायोटेकने पहिल्या लसीचं घोषणा केली. त्यामुळे संपूर्ण जगाचं लक्ष या लसीकडे लागून आहे.