कोरोना, नैसर्गिक आपत्तीमध्ये वीज कर्मचाऱ्यांची, कामगिरी अभिमानास्पद – मुख्य अभियंता तालेवार

0
270

– उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महावितरणच्या ५६ जनमित्रांचा गौरव

पुणे, दि. १७ (पीसीबी): ‘गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाचा काळ व दोन्ही चक्रीवादळाच्या नैसर्गिक आपत्तीमध्ये महावितरणचे अभियंते व कर्मचारी हे सुरळीत वीजपुरवठा तसेच ग्राहकसेवेसाठी अत्यंत खडतर व आव्हानात्मक परिस्थितीत कर्तव्य बजावीत आहेत व त्यांचे कार्य अभिमानास्पद आहे’, असे गौरवोद्गार मुख्य अभियंता श्री. तालेवार यांनी रविवारी (दि. १५) उत्कृष्ट कर्मचाऱ्यांचा सन्मान करताना काढले.

सन २०२०-२१ मध्ये उत्कृष्ट ग्राहकसेवा, सुरळीत वीजपुरवठा, वीजवाहिन्या व उपकेंद्रांची विनाअपघात तांत्रिक देखभाल व दुरुस्ती करणाऱ्या महावितरणच्या पुणे परिमंडलमधील उत्कृष्ट १४ यंत्रचालक व ४२ तांत्रिक कर्मचाऱ्यांना स्वातंत्र्यदिनानिमित्त स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. रास्तापेठ येथील प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात मुख्य अभियंता श्री. सचिन तालेवार यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी महापारेषणचे प्रभारी मुख्य अभियंता श्री. जयंत कुलकर्णी, सुरक्षा व अंमलबजावणी विभागाचे पुणे परिक्षेत्राचे उपसंचालक कमांडर शिवाजी इंदलकर, अधीक्षक अभियंता सर्वश्री राजेंद्र पवार, प्रकाश राऊत, सतीश गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.

पाहुण्यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व स्मृतिचिन्ह देऊन उत्कृष्ट ५६ जनमित्रांना गौरविण्यात आले. कार्यक्रमाला सहाय्यक महाव्यवस्थापक सौ. माधुरी राऊत (वित्त व लेखा) व सौ. ज्ञानदा निलेकर (मानव संसाधन) आदींसह अधिकारी, कर्मचारी, कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधींची उपस्थिती होती. सूत्रसंचालन उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री. शिरीष काटकर यांनी केले व आभार मानले.

पुणे परिमंडलातील उत्कृष्ट तांत्रिक कर्मचारी पुढीलप्रमाणे – जनार्दन शिवरकर, अविनाश वणवे, उत्तम बिरादार, गणेश पवार (बंडगार्डन विभाग), विठ्ठल वाणी, संतोष मावसकर, रामहरी मोराळे, भगवान चौधरी (नगररोड विभाग), बाबासाहेब शिंदे, भूषण सिसोदिया, हेमंत जाधव, गणेश जगताप (पद्मावती विभाग), काशिनाथ माळी, बालाजी पगलवाड, अक्षय गजभिये, धनाजी फणसे (पर्वती विभाग), अरीप पिंजारी, दिनेश कामठे, संदीप भोटे, बापूराव चाटे (रास्तापेठ विभाग), प्रल्हाद सोनावणे, माणिक वाव्हळे (रास्तापेठ चाचणी विभाग), दिलीप गायकवाड, सिध्दार्थ भोर, पांडूरंग ठोगिरे, गोविंदा चोपडे (भोसरी विभाग), अजय कामेगावकर, रघुनाथ केदारी, सागर जाधव, मनोहर राठोड (कोथरूड), प्रकाश सोत, विजय शिंदे, विकास लडकत, संजय किर्वे (पिंपरी विभाग), तुकाराम सातर्डेकर, कृष्णा बढे, सुरेश केळघणे, सुरेश खरात (शिवाजीनगर विभाग), मारुती गभाले, सचिन सांडभोर, सुखनंद डोणे, खलील तांबोळी, शिलरतन भवरे, अमित बनकर (मंचर विभाग), राहुल आहेर, राहुले लेंडे, राजकुमार हरिहर समीर मुजावर, गोरख कुंडे (मुळशी विभाग), प्रविण घनवट, गोविंद थोरात, श्रीकांत मुंडे, दीपक तनपुरे, काळू शिंदे व उमेश सावळे (राजगुरुनगर विभाग)