कोरोनाच्या भीतीने संपवलं आयुष्य; पिंपरी-चिंचवडमध्ये एकाची गळफास घेऊन आत्महत्या

0
340

चिंचवड,दि.११(पीसीबी) : पिंपरी-चिंचवड मधील एका घटनेने सगळीकडे खळबळ उडाली आहे. एका ६७ वर्षीय व्यक्तीला डॉक्टरांनी सतत ताप, खोकला आणि थंडी असल्यामुळे कोरोना चाचणी करण्याचा सल्ला दिला पण, त्या व्यक्तीने कोरोनाच्या भीतीनं गळफास घेऊन आत्महत्या केली. शिवाजी मारुती होळकर (रा. भोसरी) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरीमधील गव्हाणे वस्ती येथे शिवाजी होळकर हे कुटुंबासह राहतात. गेल्या आठ दिवसांपासून त्यांना थंडी, ताप आणि खोकला येत असल्याचे त्यांनी डॉक्टरांना दाखवले. मात्र, तुम्हाला कोरोनाची लक्षण आहेत. तुम्ही टेस्ट करून घ्या अस अधिक उपचारासाठी त्यांना सांगितले होते. मात्र, आज शुक्रवारी पहाटे च्या सुमारास त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

मयत शिवाजी यांनी आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहिली असून त्यात शिवाजी होळकर यांनी म्हटलं आहे की, मला गेल्या आठ दिवसांपासून थंडी, ताप आणि खोकला येत होता. डॉक्टरांकडे गेलो होतो. त्यांनी करोनाची भीती घातली, मी आत्महत्या करत आहे यासाठी कोणाला जबाबदार धरू नये असं आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत त्यांनी म्हटले आहे. मात्र, त्यांनी कोणत्या डॉक्टरांकडे तपासणी केली हे समजू शकले