कोरोनाग्रस्त पतीच्या अंत्यसंस्कारासाठी विनंती करत राहिली पत्नी; मात्र, निगम कर्मचार्यांनी केली ४० हजार रुपयांची मागणी

0
164

गोरखपूर, दि.२८ (पीसीबी) : राप्ती तटावर स्थित राजघाटवरती अंतिम संस्काराच्या नावावर १५ हजाराची मागणी केल्याबद्दल मंगळवारी रात्री हंगामा झाला. दुसर्‍या जिल्ह्यात एका दरोगाच्या बायकोचा अंतिम विधी करण्यासाठी पैसे मागीतले असता त्यांनी विरोध केला. तेव्हा त्यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली असता पोलीस आले. या सगळ्या गोंधळामध्ये रात्री उशिरा पर्यंत अंतिम संस्काराची प्रक्रिया थांबली होती.

राजघाट वर कोरोना संसर्ग झालेल्या मृतदेहावर अंतिमसंस्कार करण्याची व्यवस्था नगर निगमची होती. या वेळी रात्री शव जाळण्यात आले. दरोगाची बायको दाउदपुर स्थित एका कोविड हॉस्पिटल मध्ये निधन पावली. अंबुलेंस मधून त्यांचे शव राजघाट वरती आणण्यात आले. इथं त्यांनी अंत्यसंस्कार करण्याचे 15 हजार मागितले. दरोग म्हणाले कि, निगमच्या कर्मचाऱ्यांपैकी चंदन ने पैसे मागितले.

तर त्याचवेळी खजनी शहरची एक महिला आपल्या मृत पतीचा मृतदेह अंबुलेंसमधून घेऊन रात्री राजघाटवर पोहचली असता त्यांनी लोकांकडे अंतिम संस्कार करण्याची विनंती केली. तक्रारीत या महिलेकडे १५ हजाराची मागणी केली गेली. तेव्हा सातशे रुपये देण्याचे महिलेने म्हंणताच तेथील लोकांनी अंतिम संस्कार करण्यास नकार दिला. मग तेव्हा आपल्या पत्नीच्या अंत्यसंस्कार करण्यासाठी आलेल्या दरोगाने त्या महिलेच्या पतीच्या अंत्यसंस्काराची व्यवस्था केली.