कोरेगाव-भीमा येथे जाऊन विजयस्तंभाचे दर्शन घेणारच; चंद्रशेखर आझादांचा निर्धार

0
762

मुंबई, दि. ३० (पीसीबी) –  पुण्यातील कोरेगाव-भीमा येथे जाऊन विजयस्तंभाचे दर्शन घेणारच, असा ठाम निर्धार भीम आर्मी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांनी  केला आहे. तसेच पुण्यातील भीम आर्मी संघटनेचे शहर अध्यक्ष दत्ता पोळ यांनीही ठरलेल्या नियोजनानुसार कार्यक्रम होईल आणि उद्या कोरेगाव भीमा येथील विजय स्तंभास अभिवादन करण्यास देखील जाणार, असे त्यांनी सांगितले.

गेल्या तीन दिवसांपासून नजरकैदेत ठेवण्यात  आलेले चंद्रशेखर आझाद यांची अखेर सुटका करण्यात आली आहे. त्यानंतर मालाडच्या हॉटेलमध्ये नजरकैदेत ठेवण्यात आले होते. अनेक सामाजिक संघटनांकडून दबाव आल्यानंतर आझाद यांची नजरकैदेतून सुटका करण्यात आली आहे.

चंद्रशेखर आझाद पुण्यात चार वाजेपर्यंत पोहचणार असून पुण्यातील सभेबाबत आम्ही मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. सभेच्या परवानगीबाबत थोड्याच वेळात निर्णय येईल. आम्हाला परवानगी मिळेल असा विश्वास दत्ता पोळ यांनी व्यक्त केला आहे.

चंद्रशेखर आझाद हे दुपारी चार वाजेपर्यंत पुण्यात पोहचतील. तसेच ठरलेल्या नियोजनानुसार कार्यक्रम होईल आणि  कोरेगाव भीमा येथील विजय स्तंभास अभिवादन करण्यास देखील जातील. असे त्यांनी सांगितले.